मित्रांनो कल्पना करा की, तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहात आणि अचानक पैशांची गरज भासते तेव्हा मोबाईलची लिमिट पण संपली आहे तेव्हा तुम्ही काय कराल. तर मित्रांनो tension घेऊ नका, आता ना स्टेशन शोधायचं झंझट, ना एटीएम! कारण आता एटीएम येतंय थेट तुमच्यापर्यंत ते पण धावत्या ट्रेनमध्ये. भारतीय रेल्वेने एक अनोखी आणि क्रांतिकारी पायरी उचलली आहे. देशातील पहिली “ATM ट्रेन सेवा” सुरू करून. ही भन्नाट सुविधा सध्या महाराष्ट्रातील पंचवटी एक्सप्रेसमध्ये उपलब्ध असून, रोज मुंबई ते मनमाड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही एक ऐतिहासिक आणि सोयीस्कर सेवा ठरतेय. चला तर जाणून घेऊया याच्याबद्दल थोडक्यात.
धावत्या ट्रेनमध्ये ATM! भारतीय रेल्वेची क्रांतिकारी सुरुवात | Indian Railways Launches First-Ever Train ATM Service
ट्रेनमध्ये ATM म्हणजेच “चालताना कॅश मिळवण्याची सोय”
पंचवटी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये लावलेलं भारताचं पहिलं ऑटोमेटेड टेलर मशीन (ATM) आता प्रवासादरम्यान अनेक गरजा पूर्ण करणार आहे. प्रवासी कॅश विड्रॉ, स्टेटमेंट प्रिंट, चेकबुक ऑर्डर अशा सेवा ट्रेनमध्येच मिळवू शकतात.
ही संकल्पना भुसावळ विभागाच्या INFRIS बैठकीत समोर आली आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी करून हा कोच तयार करण्यात आला. ट्रायल दरम्यान इगतपुरी आणि कसारा दरम्यान नेटवर्क कमी मिळालं, पण संपूर्ण चाचणी एकूण यशस्वी ठरली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या ATM वर 24×7 CCTV मॉनिटरिंग असेल आणि गरज पडल्यास याला बंदही करता येईल, म्हणजेच सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.
प्रवाशांकडून कौतुक, आणि भविष्यातील विस्ताराचा मार्ग मोकळा
मित्रांनो या सेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नितीन राठोड नावाच्या प्रवाशाने म्हटलं, रेल्वेची ही एक कौतुकास्पद आणि गरजेची पावलं आहे. या सुविधेमुळे अचानक गरज पडल्यास कॅश मिळवणं सोपं झालं आहे.
या ट्रेनची रॅक मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस (12071) सोबत शेअर केली जाते, त्यामुळे या ट्रेनमध्ये देखील पुढील काळात ही सुविधा मिळू शकते. जर सर्वत्र ही चाचणी यशस्वी झाली, तर भारतीय रेल्वेच्या इतिहासात ATM ट्रेन सेवा हा एक नवा टप्पा ठरेल.