हे बघ मित्रा, आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की एकदा का सरकारी नोकरी लागली, की आयुष्य निवांत झालं! पण सरकारी नोकरी म्हणजे काही दुकानात मिळणारी वस्तू नाही बाप्पा. मेहनत लागते, जिद्द लागते आणि योग्य दिशा लागते. आता बघ, पेट्रोलियम मंत्रालयाची नोकरी म्हणजे काय सांगू. थेट देशाच्या इंधनखात्याशी जोडलेली जबाबदारी! आणि ही संधी गावाकडच्या मुलांना मिळाली, तर गावातच काय, तालुक्यात पण नाव होणार हं! पण त्यासाठी पायात चपला झिजवल्या पाहिजेत, डोळ्यात झोप घातली पाहिजे, आणि मनात फक्त एकच विचार ठेवला पाहिजे, माझंही एक दिवस होणार.
या लेखात आपण अगदी सोप्या भाषेत, साध्या शब्दांत पेट्रोलियम मंत्रालयाची भरती कशी करायची, काय अभ्यास करायचा, आणि गावात राहूनही मोठं स्वप्न कसं गाठायचं. हे सगळं जाणून घेणार आहोत. चला तर मग, टाकूया एक जबरदस्त सुरुवात आपल्या स्वप्नांच्या प्रवासाला.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या भरती तयारी कशी करावी? | How to Prepare for Petroleum Ministry Recruitment in Marathi
पेट्रोलियम मंत्रालय हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा विभाग आहे जो देशातील इंधन, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आणि त्यांच्याशी संबंधित धोरणे तयार करतो. या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ONGC, IOCL, BPCL, HPCL, GAIL यासारख्या मोठ्या कंपन्या येतात. या मंत्रालयामार्फत वेळोवेळी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण भागातील मुला-मुलींना जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही संधी सोन्यासारखी असते.
भरतीमध्ये कोणकोणती पदं असतात?
पेट्रोलियम मंत्रालय किंवा त्याच्या अधीन असलेल्या कंपन्यांमध्ये भरती वेगवेगळ्या पदांसाठी होते. उदाहरणार्थ –
- टेक्निकल असिस्टंट
- अकाउंट्स असिस्टंट
- डेटा एंट्री ऑपरेटर
- स्टेनोग्राफर
- इंजिनीअर (डिप्लोमा/डिग्री)
- मॅनेजमेंट ट्रेनी
- मार्केटिंग/HR एग्जिक्युटिव्ह
- क्लार्क / ऑफिस असिस्टंट
या पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी असते. काहीसाठी फक्त 10वी/12वी पुरेसे असते, तर काहींसाठी डिप्लोमा, ग्रॅज्युएशन किंवा MBA लागते.
अभ्यासक्रम समजून घ्या
भरती परीक्षा ही कोणत्या पदासाठी आहे त्यावर अभ्यासक्रम ठरतो. मात्र खालील विषय बहुतांश परीक्षा मध्ये असतात.
- सामान्य ज्ञान (GK)
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इंग्रजी भाषा
- गणित (Quantitative Aptitude)
- बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
- तांत्रिक विषय (Technical knowledge जर टेक्निकल पोस्ट असेल तर)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यासाठी आपल्या शाळेतील जुन्या पुस्तकांचा अभ्यास करावा, विशेषतः गणित आणि विज्ञानाचे. याशिवाय मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतील माहिती उपयुक्त ठरते.
पुस्तकांची निवड, स्वस्त पण चांगली
गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं महाग असतात, म्हणून खालील पुस्तकांचा वापर करा.
- सामान्य ज्ञान: “Lucent General Knowledge” (हिंदी/मराठी दोन्हीमध्ये उपलब्ध)
- चालू घडामोडी: दर महिन्याचं “Yojana” मासिक, आणि YouTube वर Weekly GK व्हिडिओ
- गणित: R.S. Agarwal चं “Quantitative Aptitude”
- Reasoning: “A Modern Approach to Logical Reasoning” – R.S. Agarwal
- इंग्रजी: Wren & Martin आणि काही प्रॅक्टिस वर्कबुक्स
- तांत्रिक विषय: डिप्लोमा किंवा डिग्रीचे टेक्स्टबुक्स, किंवा NPTEL/YouTube चॅनल्स.
रोजचा अभ्यासाचा प्लॅन, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली
गावात इंटरनेट कमी असलं तरी रोज 6-8 तास नियमित अभ्यास करून भरतीची तयारी करता येते. उदाहरण –
- सकाळी 2 तास – गणित
- सकाळी 1 तास – Reasoning
- दुपारी 1 तास – GK/Current Affairs
- संध्याकाळी 2 तास – इंग्रजी आणि टेक्निकल
- रात्री 1 तास – Revision आणि टेस्ट पेपर
तयारी करताना मोबाईल, टीव्ही आणि फालतू गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. मेहनत आणि सातत्य हेच गावातून बाहेर पडायचं प्रमुख शस्त्र आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन तयारी कशी करावी?
जर मोबाईलमध्ये डेटा असेल तर खालील गोष्टी करा.
- YouTube वरून अभ्यास व्हिडिओ पाहा (Ex: Study2Win, Examपुर, Adda247 Marathi)
- Free mock test अॅप्स डाउनलोड करा – Testbook, Oliveboard, Adda247
- सरकारी वेबसाइटवरून जुने पेपर डाउनलोड करा
ऑफलाइन तयारीसाठी
- गावात ग्रुप करून अभ्यास करा
- दर रविवारी एकमेकांना टेस्ट घ्या
- शाळेतील शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या
- नोट्स तयार करत चला – विशेषतः GK आणि इंग्रजीचे.
परीक्षा आणि निवड प्रक्रिया
भरतीची प्रक्रिया सहसा 2 टप्प्यात असते.
- लिखित परीक्षा – ज्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असतो
- इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्ट – पदानुसार व्यावहारिक कौशल्य चाचणी घेतली जाते
कधी कधी फक्त merit list वर निवड होते. जर पदसंख्या कमी असेल तर. म्हणून तयारी करताना भरपूर mock test सोडवा.
शारीरिक आणि मानसिक तयारी
काही पदांसाठी (उदा. फील्ड असिस्टंट) शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाऊ शकते. यासाठी रोज 30 मिनिटे चालणं, पळणं आणि थोडं व्यायाम करणं गरजेचं आहे. मानसिक तयारी म्हणजे अपयश आल्यावर खचून न जाता, दुसऱ्यांदा जोमाने अभ्यास सुरू करणं. “गावातून पण मोठं काहीतरी करता येतं” हा आत्मविश्वास ठेवा.
अनुभव असलेल्या लोकांशी संपर्क ठेवा
गावातले किंवा तालुक्यातले ज्यांनी ही परीक्षा दिली आहे किंवा सरकारी नोकरी मिळवली आहे, त्यांच्याशी बोलून मार्गदर्शन घ्या. ते तुमच्यापेक्षा आधी चुकले आहेत, त्यांनी दिलेल्या टिप्स तुमचं आयुष्य बदलू शकतात.
आत्मविश्वास आणि चिकाटी ठेवा
शहरातल्या मुलांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांकडे साधने कमी असतात, पण मेहनतीची ताकद जास्त असते. तुम्ही अभ्यास करत राहिलात, वेळ वाया घालवला नाहीत, तर कुठलीही परीक्षा तुम्हाला थांबवू शकत नाही. रोज सकाळी स्वतःशीच बोला “माझं ध्येय मोठं आहे, मी त्यासाठी लायक आहे”.
जॉब लागल्यानंतर काय?
भरतीमध्ये यश मिळाल्यानंतर तुमचं पोस्टिंग देशाच्या कुठल्याही भागात होऊ शकतं. तिथं प्रामाणिकपणे काम करा, अनुभव घ्या आणि आपल्या गावातल्या इतर तरुणांना मार्गदर्शन करा. एक गावठी विद्यार्थ्याने जर पेट्रोलियम मंत्रालयात नोकरी मिळवली, तर तो इतर शंभर जणांसाठी आदर्श ठरतो.
अर्ज प्रक्रिया कशी समजून घ्यावी?
पेट्रोलियम मंत्रालय किंवा त्याच्या अधीन असलेल्या कंपन्यांच्या भरतीसाठी अर्ज ही पहिली पायरी असते. बऱ्याच वेळा उमेदवार फॉर्म चुकीचा भरतात आणि संधी गमावतात. म्हणून अर्ज भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- भरतीची जाहिरात नीट वाचा. पदाचं नाव, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, फॉर्म फी, परीक्षा पद्धत, हे सगळं लिहून ठेवा.
- फॉर्म भरताना शैक्षणिक माहिती, फोटो, सही (signature), ओळखपत्र (आधार/पॅन) तयार ठेवा.
- अर्ज सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करा (उदा. https://petroleum.nic.in/ किंवा संबंधित कंपनीच्या वेबसाइटवरून)
- अर्ज झाल्यावर त्याची प्रिंटआऊट घेऊन ठेवणे फायदेशीर ठरतं.
सिलेबस वर आधारित खास टिप्स, ट्रिक वापरून शिकणं
तयारी करताना आपण डोके वापरून शिका. उगाच मोठं मोठं वाचत बसू नका. यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स:
- GK साठी महिन्याला एक GK नोटबुक ठेवा, त्यात देश-विदेशातल्या महत्वाच्या बातम्या लिहा.
- गणितासाठी Shortcut Tricks वापरा. उदा. Square, Cube, Divisibility Rules, Percent Shortcut.
- Reasoning मध्ये Regular Puzzle सोडवा – सुरुवातीला सोपं, नंतर जड.
- इंग्रजी शब्दसंग्रह वाढवा – रोज 5 नवीन इंग्रजी शब्द मराठीत अर्थासकट लिहा.
- एक वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार चालायचं ठरवा.
हे सुध्दा वाचा:- फॅशन डिझायनर व्हायचंय ? जाणून घ्या शिक्षण, संस्था आणि करिअरच्या संधी
गावाकडून मोठं स्वप्न बघायचं असेल तर डिजिटलचा वापर करा
- आता जमाना डिजिटलचा आहे. अगदी ग्रामीण भागात राहूनही मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेता येतं. त्यासाठी:
- “YouTube वर Day-Wise Target Videos” बघा
- टेलीग्रामवर काही चांगले चॅनल जॉईन करा (Ex: Govt Job Updates, Majhinaukri.com, Daily GK)
- मोबाईलमध्ये Study Time Tracker अॅप इंस्टॉल करा
- “Text to Speech” App वापरून Current Affairs ऐका – यामुळे डोळे न लागता अभ्यास होतो.
इंग्रजी भाषेची भीती काढून टाका
- गावात राहणाऱ्यांना इंग्रजी खूप मोठं अडथळा वाटतो. पण खरं सांगतो, इंग्रजीची भीती घालवली तर निम्मं यश तुमचं.
- रोज 1 इंग्रजी बातमी मराठीत समजून घ्या.
- इंग्रजी वाक्यांचा सराव बोला, भले चुकीचं बोला, पण बोलत रहा.
- ग्रामर शिकताना Part of Speech, Tense, Voice यांचं बेसिक समजून घ्या.
- Wren & Martin किंवा मराठी इंग्रजी व्याकरण यांचं पुस्तक वाचा.
- परीक्षा डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी शिकणं ही यशाची गुरुकिल्ली आहे.
मुलाखत, तुमचं व्यक्तिमत्त्वचं तुमचं हत्यार आहे
लेखी परीक्षेनंतर काही पदांकरिता मुलाखत घेतली जाते. यासाठी:
- तुमच्या शिक्षणाबद्दल, गावाबद्दल, आवडीनिवडींबद्दल सुस्पष्ट उत्तर द्या.
- आत्मविश्वासाने बोला, पण अहंकार दाखवू नका.
- कपडे स्वच्छ, साधे असावेत – फार फॅन्सी नको.
- इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या डोळ्यात बघून बोला.
- घरातच आई/वडील किंवा मित्राकडून रोज 5 मिनिटं इंटरव्ह्यूचा सराव घ्या.
आर्थिक परिस्थितीमुळे हार मानू नका, स्कॉलरशिप आणि मोफत साधने
खूप विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, पण घरी पैसे नसतात. अशांसाठी काही उपाय:
- राज्य सरकारकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप्सचा उपयोग करा
- काही कोचिंग क्लासेस दर महिन्याला मोफत सेमिनार घेतात. त्यात भाग घ्या.
- Internet Café मध्ये एक तासात भरपूर माहिती गोळा करता येते.
- मित्रांच्या नोट्स घ्या, एकमेकांना शिकवा.
- काही NGO संस्थांमार्फत मोफत पुस्तके मिळतात. विचारपूस करून मिळवा.
चुका टाळा, परीक्षा अपयश टाळण्यासाठी
- शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास टाळू नका.
- चुकीचे अर्ज भरून संधी घालवू नका.
- फक्त पाठांतरावर भर नका,समजून अभ्यास करा.
- सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका.
- अपयश आलं तरी दुसऱ्यांदा डबल जोमात तयारी करा.
एक आदर्श बनवा, तुमच्यावर दुसरे शिकतील
जेव्हा एक गावातील मुलगा पेट्रोलियम मंत्रालयात अधिकारी होतो तेव्हा तो इतरांसाठी ‘प्रेरणा’ बनतो. म्हणूनच,
- स्वतः लढा, शिकून घ्या.
- जे शिकता ते इतरांना शिकवा.
- गावात एक ग्रुप बनवा. “सरकारी नोकरी अभ्यासमंडळ”
- WhatsApp Group किंवा Telegram Group तयार करा, आणि त्यातून एकमेकांना अपडेट द्या.
- एकमेकांना वर खेचत चला, गाव बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा.
शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं
आई-वडिलांची प्रार्थना आणि आशीर्वाद, कोणतीही गोष्ट आई-वडिलांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या ध्येयाबद्दल सांगा, त्यांचा आशीर्वाद घ्या. ते तुमच्यासाठी दररोज देवाकडे प्रार्थना करतील आणि तेच तुमचं छुपं बळ ठरेल.
ही फक्त नोकरी नाही, ही एक जबाबदारी आहे. एक गावातला मुलगा देशाच्या इंधन व्यवस्थापनात सहभागी होतो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. जर तुम्ही ठरवलं तर तयारी ही मजा वाटेल, आणि यश जवळच आहे असं वाटू लागेल. तर चला, आजपासूनच सुरुवात करूया “मी पेट्रोलियम मंत्रालयात अधिकारी होणार!असं मनाशी ठरवून.