भारत सरकार व प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्सकडून फ्री कोर्सेस | Free Government & Private Courses Start Learning Today in Marathi

मित्रांनो आजच्या डिजिटल युगात कौशल्य (Skills) हीच खरी ताकद आहे. नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य स्कील्स असणं खूप गरजेचं आहे. हीच गरज ओळखून अनेक सरकारी व खासगी संस्था आज मोफत कोर्सेस (Free Courses) उपलब्ध करून देत आहेत. चला तर जाणून घेऊया असेच काही उपयोगी कोर्सेस आणि ते कुठून करता येतील.

भारत सरकार व प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्सकडून फ्री कोर्सेस | Free Government & Private Courses Start Learning Today in Marathi

SWAYAM सरकारकडून ऑनलाईन मोफत शिक्षण

SWAYAM (Study Webs of Active–Learning for Young Aspiring Minds) ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये UGC, AICTE, NPTEL सारख्या संस्थांकडून शिकवले जाणारे कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. देशातील IIT, IIM आणि अन्य नामांकित शिक्षणसंस्थांचे प्रोफेसर्स येथे शिकवतात. सर्व कोर्सेस मोफत असून, प्रमाणपत्रासाठी थोड फार शुल्क आकारलं जाऊ शकतात.

Website: https://swayam.gov.in

Google Digital Garage डिजिटल मार्केटिंगचं फ्री ट्रेनिंग

Digital Skills शिकायचे असतील, तर Google Digital Garage हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला ‘Fundamentals of Digital Marketing’ नावाचा मोफत कोर्स मिळतो. 26 मॉड्यूल्समध्ये विभागलेला हा कोर्स इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आहे आणि पूर्ण झाल्यावर Google कडून प्रमाणपत्र देखील मिळते. डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे.

Website: https://learndigital.withgoogle.com

Coursera, International Courses फ्री मध्ये

Coursera हे एक ग्लोबल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, जे जगभरातील टॉप युनिव्हर्सिटीजसोबत कोर्सेस पुरवतं. इथे तुम्ही audit मोडमध्ये बरेचसे कोर्सेस मोफत करू शकता. Data Science, Programming, Artificial Intelligence, Business Management यासारख्या विषयांमध्ये येथे हजारो कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कोर्सेसवर स्कॉलरशिपही मिळू शकते.

Website: https://coursera.org

FreeCodeCamp, कोडिंग शिकण्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म

जर तुम्हाला Software Development, Web Development किंवा Programming मध्ये स्वारस्य असेल, तर FreeCodeCamp हा एक अत्यंत उपयुक्त आणि 100% मोफत प्लॅटफॉर्म आहे. येथे HTML, CSS, JavaScript, Python यांसारख्या भाषांचे कोर्सेस मिळतात. प्रत्येक कोर्समध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स असतात जे तुम्हाला खऱ्या अनुभवासारखं शिकवतात.

Website: https://www.freecodecamp.org

NIELIT, भारत सरकारचा डिजिटल साक्षरता कार्यक्रम

National Institute of Electronics & Information Technology (NIELIT) कडून Computer Basics, Digital Literacy, आणि Data Entry सारख्या कोर्सेस मोफत दिले जातात. हे कोर्सेस खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हे कौशल्य खूप उपयोगी पडते.

Website: https://www.nielit.gov.in

घरबसल्या शिक्षण घेणं आता खूप सोपं झालं आहे. वरील कोर्सेस फक्त मोफतच नाहीत, तर तुमचं करिअर घडवण्यासाठी आवश्यक त्या स्कील्सही शिकवतात. फक्त इच्छाशक्ती ठेवा आणि सुरुवात करा. शिक्षण हेच यशाचं खरं शस्त्र आहे.

Majhi naukri
Majhi naukri

करिअर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी, योग्य माहिती, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे हेच आमचं ध्येय आहे. शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात आमचा प्लॅटफॉर्म तुमच्यासोबत प्रत्येक टप्प्यावर असेल.

Articles: 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *