आजच्या घडीत ज्यानं संगणक शिकलं नाही, त्याला गावात गिनतीत घेत नाहीत. अगदी सरकारी फॉर्म असो, बँकेचं काम असो, की मुलाच्या ऑनलाईन शाळेचा टाइमटेबल सगळं मोबाईल आणि संगणकावरच अवलंबून झालंय. आता यामध्ये आपण मागं राहिलो, तर बघणाऱ्यालाच लाज वाटेल, पण काळजी करू नका, MS-CIT (What is MS-CIT? Full Syllabus & Job Opportunities After MS-CIT) नावाचा एक कोर्स हाय, जो अगदी झेरॉक्सवाल्यापासून लेकरांच्या आईपर्यंत, सगळ्यांना संगणक शिकवतो. तो एकदा शिकला की मग ‘Enter’ दाबताना हात थरथरत नाही, उलट ते बोटं आत्मविश्वासानं नाचायला लागतात.
MS-CIT म्हणजे काय रे बाबा?
मित्रांनो , MS-CIT म्हणजे “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी”. हे MKCL वालं चालवतं. म्हणजे असं बघ, ज्याचं संगणकाशी काहीही देणंघेणं नव्हतं त्यालाही हे कोर्स झालं की संगणकावर काम करता येतं. बोटं सटकन कीबोर्डवर चालायला लागतात, आणि माउसही आपल्या हातात जणू झोपतो. हे कोर्स फक्त शिकवणं नाही करत, तर बऱ्याच सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचं दार उघडून देतो.
या अभ्यासात काय काय असतं रे यात?
संगणकाची थोडक्यात ओळख
सुरुवात होते एकदम बेसिकपासून, संगणक म्हणजे काय? त्याची आई-बहीण कोण? म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, माउस, कीबोर्ड, सीपीयू हे सगळं काय ते समजावतात.
विंडोज वापरायचं कसं?
डेस्कटॉपवर जे दिसतं, ते टास्कबार काय करतो, Start Menu कसं वापरायचं, File-Folder कसे तयार करायचे, डिलीट करायचे अगदी चहा कसा करायचा तेवढं सोपं करून सांगतात.
MS Word
पत्र लिहायचं असेल, अर्ज टाईप करायचं असेल, की मग रेसिपी लिहायची असेल, MS Word मध्ये सर्व काही करता येतं. Formatting, Tables, Mail Merge सगळं शिकवतात.
MS Excel
अंकगणितात दम असला तर Excel तुफान आवडतो. सगळे हिशोब, साठा, तक्ते, फॉर्म्युले एवढ्या पद्धतीने शिकवतात की गावातल्या किराणा दुकानाचं व्यवस्थापनही तू Excel मध्ये करू शकतोस.
PowerPoint
म्हणजे मस्तपैकी स्लाइड्स बनवायच्या, शाळा-कॉलेजच्या प्रेझेंटेशनसाठी किंवा कुणाकडं काय माहिती सांगायची असली की ह्या PowerPoint चा वापर होतो.
इंटरनेटचा वापर
गावात आता नेट आलंय, पण त्याचा योग्य वापर माहीत नसतो. कसा सर्च करायचा, फॉर्म कसा भरायचा, डाउनलोड कसं करायचं हे सगळं समजावून सांगतात.
ई-मेल
Email म्हणजे डिजिटल जमाना! Gmail अकाउंट कसं तयार करायचं, मेल कसा पाठवायचा, फोटो/डॉक्युमेंट जोडायचा हे शिकल्याशिवाय नोकरीत पाय ठेवूच नको.
डिजिटल व्यवहार
Aadhar, PAN, UPI, Google Pay, मोबाईल बँकिंग हे सगळं आता जगण्याचा भाग झालंय. MS-CIT मध्ये हे सगळं शिकवतात. गावच्या बँकेतून काम करून येण्याआधी तू मोबाइलवर ते करून दाखवशील.
सिक्युरिटी म्हणजे काय?
पासवर्ड ठेवा नीट, मेल मध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. ह्या गोष्टी शिकवतात जेणेकरून फसवणूक होऊ नये.
इंग्रजी व मराठी टायपिंग
टायपिंग तर गावातल्या साहेबालाही नीट येत नाही, पण MS-CIT मध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत पटापट टायपिंग शिकवतात.
कोर्स कसा चालतो?
- एक eLearning म्हणजे स्वतः अभ्यास करायचा.
- दुसरं practical – संगणकवर बोटं चालवायची.
- आणि तिसरं म्हणजे मार्गदर्शन – शिक्षक शिकवतात.
- शिकताना व्हिडीओ, अॅनिमेशन, गेम्ससुद्धा असतात, म्हणजे कंटाळा येत नाही.
परीक्षा कसली असते?
शेवटी दोन टेस्ट असतात:
- ऑनलाइन प्रश्नपत्रिका – 50 मार्क
- प्रॅक्टिकल – 50 मार्क
एकूण 100 पैकी 40 मार्क मिळाले की पास! आणि हो, त्याचं सर्टिफिकेटही MKCL कडून मिळतं एकदम मान्यताप्राप्त.
कोण करू शकतं MS-CIT?
- वय हे 10 वर्षांपेक्षा जास्त असलं की झालं.
- शिकलेलं नसलं तरी हरकत नाही.
- मनात शिकायची तयारी असली की कोणीही करू शकतं.
फी किती असते?
साधारण 4500 ते 5000 रुपये इतकी फी असते. काही वेळा शासकीय सवलतही मिळते. जवळचं सेंटर शोधून तिकडं एक फेरी मार.
नोकरीच्या संधी काय?
Data Entry Operator
सरकारी ऑफिस, बँका, हॉस्पिटलमध्ये डेटा भरायचं काम.
Computer Operator
कंप्युटरवर काम करणं म्हणजे मेल्स, प्रिंट, डॉक्युमेंट्स ह्याचं काम.
क्लार्क / ऑफिस असिस्टंट
नोकरीसाठी अर्ज, फायली ठेवणं, रेकॉर्ड्स सांभाळणं हे काम येतं.
CSC / सेवा केंद्र चालवणं
स्वतःचं ऑनलाइन सेवा केंद्र सुरू करता येतं . आधार अपडेट, बँकिंग सेवा, बिले भरणं वगैरे.
Freelance
घरी बसून टायपिंग, Excel वर्क, CV बनवणं हे काम मिळू शकतं.
पुढं काय करता येईल?
MS-CIT नंतर खालील कोर्स करता येतील:
- Tally with GST – खाजगी ऑफिसेसमध्ये उपयोगी
- DTP – कार्ड डिझाईन, पोस्टर, बॅनर वगैरे
- Web Designing – वेबसाइट तयार करणं
- Digital Marketing – फेसबुक, इन्स्टाग्राम मार्केटिंग
- Programming Language – C, Python, Java
हे सुध्दा वाचा:- 2025 मध्ये सर्वाधिक डिमांड असलेली कौशल्याधारित नोकरी
MS-CIT शाळा नसून ज्ञानाचं शेत आहे
मित्रांनो गावात शाळा असते तशीच MS-CIT म्हणजे संगणकाची शाळा आहे. पण फरक एवढाच, इथं पुस्तकं कमी आणि संगणकावर जास्त शिकवतात. मुलाबाळांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत जो कोणी शिकायचं ठरवतो, त्याला इथं थेट डिजिटल जगात उडी मारायला शिकवतात. शिक्षकही एकदम सोप्या भाषेत, समजेल तसं समजावतात त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही.
‘Enter’ दाबताना घाबरू नका, तुम्ही शिका, संगणक तुमचा ऐकेल!
सुरुवातीला संगणकासमोर बसलं की वाटतं, ही मशीन आपल्याला काही झापेल की काय! पण एकदा MS-CIT सुरू केला की तोच संगणक तुमचा साथी बनतो. MS Word मध्ये पत्र लिहिता येतं, Excel मध्ये दुकानाचा हिशोब ठेवता येतो, आणि इंटरनेटवर फॉर्म भरता येतो. शेवटी म्हणावसं वाटतं.अरे हे तर भारी सोपं हाय.
संगणक शिकणं म्हणजे नुसतं शिकणं नाही ती एक गुंतवणूक आहे
काही लोक म्हणतात, संगणक शिकून काय होणार रे? पण ऐका, आज सरकारी फॉर्म, बँकेचं काम, शेतकी अनुदान, इ-पिक नोंदणी, अगदी वीजबिल सुद्धा ऑनलाईन भरायचं असतं. अशा वेळी संगणक येत नसेल, तर शेजारच्या मुलाकडं जावं लागतं. ते टाळायचं असेल, तर MS-CIT एकदाच करून टाका, हिशेब फिट्ट!
MS-CIT सर्टिफिकेट म्हणजे संगणक साक्षरतेचं ओळखपत्र!
हा कोर्स झाल्यावर MKCL कडून प्रमाणपत्र मिळतं, एकदम डिजिटल स्वरूपात. हे सर्टिफिकेट सरकारी नोकरीच्या भरतीत, विविध संस्थांमध्ये, आणि खाजगी कंपन्यांमध्येही मान्य असतं. म्हणजे तुम्ही जिथं जाल, तिथं हे सर्टिफिकेट सांगेल, हा माणूस संगणकात पारंगत आहे.
गृहिणीपासून शाळकरी मुलांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी
हा कोर्स केवळ तरुणांसाठी नाही, तर गृहिणी, शेतकरी, दुकानदार, शिक्षक, अगदी रिटायर झालेल्या बाबांसाठीही उपयुक्त आहे. गृहिणी ऑनलाइन बँकिंग शिकतात, शिक्षक PPT तयार करतात, दुकानदार Excel मध्ये साठा मांडतात म्हणजे घरबसल्या बायका-पोरं आता डिजिटल झालंय बघा.
MS-CIT कोर्स कुठं करायचा?
तुमच्या गावाजवळचं MS-CIT अधिकृत सेंटर MKCL च्या वेबसाइटवरून शोधता येतं. शहरात असाल तर अगदी वाडीतही एखादं सेंटर सापडेल. फी साधारण ₹4500-5000 च्या दरम्यान असते. काही वेळा सरकारी सवलतीही मिळतात – विशेषतः महिला, दिव्यांग, किंवा शेतकऱ्यांसाठी.
हे शिकल्यावर तुम्हीच तुमच्या गावातलं डिजिटल केंद्र व्हाल!
MS-CIT झाल्यावर तुम्ही स्वतःचं काम सुरू करू शकता. आधार अपडेट, पॅन कार्ड, ऑनलाईन फॉर्म, फोटोकॉपीसह कंप्युटर टायपिंग सेंटर. गावात बरेचजण असे असतात जे “तू फॉर्म भरून दे ना रे” म्हणून येतात. म्हणजे नोकरी मिळो ना मिळो, तुमचं “प्रेस्टीज” मात्र नक्की वाढतं.
नोकरीसाठी नाही, तर स्वतःसाठी शिका
काही लोक म्हणतात “माझी वय झाली, आता काय शिकायचं?” पण संगणक हे वय बघत नाही. नोकरी मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी शाळेतल्या मुलांशी, मोबाइल वापरणाऱ्या मुलांशी संवाद ठेवण्यासाठी तरी MS-CIT कराच! संगणक शिकणं म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक असते.
आता मोबाईलमध्येही MS-CIT चं शिक्षण उपलब्ध!
MKCL ने LearnMate App सुरू केलं आहे, जिथून तुम्ही मोबाईलवरूनही eLearning करू शकता. म्हणजे सेंटरला न जाता घरबसल्या शिकायची सोय. शिक्षकाचं मार्गदर्शन, प्रॅक्टिकल सेशन्स आणि परीक्षा सगळं ऑनलाइन उपलब्ध आहे.
MS-CIT किती वेळा करता येतो?
कोर्स एकदा केला की संपलं असं नाही. जर एखाद्याचं पहिल्यांदा लक्ष नीट लागलं नाही, किंवा परीक्षा उत्तीर्ण झाला नाही. तरी MKCL पुन्हा करायला संधी देते. फक्त सेंटरशी संपर्क ठेवायचा आणि पुन्हा एकदा सराव करायचा.
MS-CIT मध्ये अभ्यासाचं तगडं वातावरण
हे कोर्स फक्त शिकवायचं काम करत नाही, तर विद्यार्थी स्वतः अभ्यास करेल असं Learning Environment तयार करतं. सेंटरमध्ये Air Conditioned क्लासेस, संगणकांची रांग, शिक्षकांचा सपोर्ट, एकदम कॉलजसारखं वाटतं.
MS-CIT सर्टिफिकेटला शासकीय मान्यता
हे MKCL तर्फे देण्यात येणारं प्रमाणपत्र Maharashtra Government, MPSC, Police Bharti, Talathi, ZP Bharti, Bank Jobs मध्ये मान्य आहे. म्हणजे सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना, MS-CIT सर्टिफिकेट असणं हे एक प्रकारे तुमचं बॅकअप प्लस पॉईंट ठरतं.
MS-CIT Regular + Fast Track मोड
काही लोक म्हणतात 3 महिने फार वाटतंय. त्यांच्यासाठी Fast Track मोड असतो. म्हणजे 1-1.5 महिन्यातच तेवढंच सगळं शिकवतात. फक्त दररोजचा वेळ थोडा जास्त लागतो. ज्यांना वेळ कमी आहे, त्यांच्यासाठी हे सोयीचं असतं.
MS-CIT कोर्स सोबत इतर कौशल्यविकास कोर्स
अनेक सेंटरमध्ये MS-CIT सोबत खालील कोर्सेसही साइडला शिकवले जातात:
- मराठी इंग्रजी टायपिंग (Certificate सहित)
- DTP (CorelDRAW, Photoshop)
- Tally ERP with GST
- Mobile Repairing Basic Course
- Online Business Setup Guide (Website, Facebook Page, YouTube Channel)
याचा फायदा असा, की एकदा MS-CIT शिकताना 1-2 स्किल्स अजून जोडून घेता येतात.
शासकीय योजना ज्यामुळे MS-CIT मोफतही करता येतो
काही जिल्ह्यांत MS-CIT महिला बचत गट, आदिवासी योजना, पडताळणी योजनांमध्ये मोफत शिकवला जातो. गावातले समाजसेवक किंवा पंचायत समितीमध्ये चौकशी केल्यास माहिती मिळू शकते.
यशोगाथा, ज्यांनी MS-CIT करून आयुष्य घडवलं
- एका 48 वर्षाच्या बाईंनी, ज्या फक्त सहावीपर्यंत शिकलेल्या होत्या, MS-CIT करून स्वतःचं Seva Kendra सुरू केलं.
- एका तरुणानं MS-CIT केल्यानंतर Excel मध्ये तयारी केली आणि एका खासगी कंपनीत 10,000 रुपये पगाराची नोकरी पकडली.
- एक शिक्षक MS-CIT करून आता PowerPoint वापरून शाळेतील मुले शिकवतो आणि संपूर्ण जिल्ह्यात नाव झालं.
MS-CIT चा अनुभव, विद्यार्थी काय म्हणतात?
“सुरुवातीला वाटायचं संगणक शिकणं म्हणजे फार मोठं काम. पण MS-CIT सुरू केल्यावर असं वाटलं, अरे हे तर एकदम मजेशीर आणि सोपं आहे.
— रमेश पाटील, जालना
मी फक्त चौथीपर्यंत शिकले, पण आता मी MS-CIT सर्टिफिकेट घेऊन सरकारी फॉर्म भरून देते.
— मंदा ताई, हिंगोली
सेंटर्स कसं ओळखायचं ते?
ज्यांना खरंच शिकायचंय, त्यांनी फसव्या फॉर्मच्या जाहिरातींना बळी पडू नये. MKCL च्या www.mkcl.org ह्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Locate MS-CIT Center” वर क्लिक केल्यास तुमच्या गावाजवळचं Authorized Center सापडेल.
कधी करायचा MS-CIT? उत्तर, आत्ताच!
मित्रा, संगणक शिकायचं योग्य वेळ म्हणजे “आजच”! प्रत्येक दिवस जो जातो, तो डिजिटल जगात एक पाऊल मागं फेकतो. म्हणूनच, वेळ गेल्यावर “शिकायचं होतं” म्हणण्यापेक्षा, आजच सेंटरमध्ये चौकशी करा, आणि तुमचं नाव यादीत घालून घ्या.